मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत महापौरांशी सकारात्मक चर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत महापौरांशी सकारात्मक चर्चा

9/1/2014
मुंबई : मुंबईतील मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांबाबत आमदार नीलम गोर्‍हे, पत्रकार जयश्री खाडिलकर-पांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांची बुधवारी महापौर दालनात अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन महापौरांसोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. 

महापौर प्रभू हे कोळी भगिनींशी चर्चा करताना म्हणाले की, परंपरागत व्यवसाय करणार्‍या कोळी भगिनींसाठी मुंबई शहर, पूर्व उपनगर तसेच पश्‍चिम उपनगरांत १ याप्रमाणे ३ मासळी बाजार मुंबई जिल्हा मत्स्य विक्रेत्या महिला सहकारी संस्थेने सुचवलेल्या यादीतूनच निश्‍चित करण्यात येईल. त्याचप्रमाणे ठराव क्रमांक ८८२ अन्वये ४,७0३ पैकी ४,४0१ कोळी भगिनींना महापालिकेतर्फे परवाने देण्यात आले असून उर्वरित ज्या ३0२ कोळी भगिनींना मासे विक्रीचा परवाना मिळाला नाही, त्यांना परवाना देण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करून तसेच छाननी करून त्याच्याकडील पुरावे तपासून ३ महिन्यांत ही प्रक्रिया गतिमान करण्याची सूचना महापौरांनी पालिका प्रशासनाला या वेळी केली. महापालिकेने विकसित केलेल्या मार्केटमध्ये महिलांना गाळे मिळण्यासाठी ३३ टक्के महिला आरक्षण ठेवण्याबाबत महापालिका सभागृहात ठराव करण्यात येईल. त्यासोबतच महापालिकेच्या मार्केटव्यतिरिक्त इतर ठिकाणी बसून व्यवसाय करणार्‍या कोळी भगिनींसाठी नवीन मार्केटमध्ये जागा मिळावी म्हणून स्थानिक कोळी भगिनींना व भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याबाबतचा ठराव करण्यात येणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS