वर्किंग लेडीसाठी बेस्टच्या स्पेशल बसगाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

वर्किंग लेडीसाठी बेस्टच्या स्पेशल बसगाड्या

9/1/2014
मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाइफलाइन म्हणून बेस्टला ओळखले जाते. बेस्ट उपक्रमातर्फे कामावर जाणार्‍या महिलांच्या सोयीसाठी सकाळी आणि संध्याकाळी (पीक अवरमध्ये) खास महिला स्पेशल बसगाड्या चालविण्यात येतात. या महिला स्पेशल बसेसना महिलांचाही चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे माऊंट मेरी स्टेप्स ते वांद्रे रेल्वे स्थानक (पश्‍चिम) या दरम्यान प्रत्येकी १ महिला स्पेशल बस चालविण्यास बेस्ट प्रशासनाने सुरुवात केली आहे.सध्या बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईतील रेल्वे स्थानके, नागरी वसाहत, वाणिज्य संकुले येथून काही बस मार्गावर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांच्या सोयीकरिता महिला विशेष बस फेर्‍या चालवण्यात येतात. तसेच बसमध्ये प्रवेश करण्याकरिता महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते. सातत्याने वाढत जाणार्‍या महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेता वांद्रे रेल्वे स्थानक (पश्‍चिम) ते माऊंट मेरी स्टेप्सदरम्यान चालविण्यात येणार्‍या बस मार्ग क्रमांक २१४ वर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस महिला विशेष बसफेर्‍या चालविण्यात येत आहेत. ६ जानेवारीपासून ही महिला विशेष बस चालविण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील महिलांना दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS