मुंबईत १५ टक्के पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

मुंबईत १५ टक्के पाणीकपात

9/1/2014
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ३000 मिमी. व्यासाच्या मरोशी आणि रुपारेल बोगदा प्रकल्पाशी निगडीत, १८00 मिमी. व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीच्या (जुना मलबार टेकडी जलाशय वाहिनी) रुपारेल शाफ्ट येथील जोडणीचे काम शुक्रवारी पहाटे ४.00 ते दुपारी १२.00 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वैतरणा जलवाहिनी ८ तास बंद करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेता १0 जानेवारी, २0१४ रोजी काही विभागांत १५ टक्के पाणी कपात, तर काही विभागांत संपूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई सेंट्रल, एम.पी.मिल कम्पाऊंड, ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ, डॉ. ई. मोझेस मार्गावरील जिजामाता नगर, धोबीघाट क्लार्क रोड या भागातील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद राहील. तसेच अँनी बेझंट रोड, डॉ. ई. मोझेस रोड-जी/दक्षिण विभाग, नेसबीट रोड परिमंडळ 'ई' विभाग, गिरगाव क्षेत्र 'डी' विभाग, नरिमन पॉईंट/कफ परेड क्षेत्र 'ए' विभाग या भागातील पाणीपुरवठय़ामध्ये १५ टक्के पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. तरी या नमूद केलेल्या परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाण्याचा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS