अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी आक्रमक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी आक्रमक



9/1/2014
मुंबई : राज्यभरातील आठ ते दहा हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी आझाद मैदानात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. आक्रमक झालेल्या महिलांच्या मोर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आझाद मैदानाचे गेट बंद केले, मात्र गेटवरून चढून महिला रस्त्यावर आल्या आणि आक्रमक झाल्या. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिराच भेट घेणार असल्याचे सांगितल्याने कमालीच्या गारठय़ातही सर्व महिला उशिरापर्यंत आझाद मैदानात बसून होत्या.

बोनस, माधनात वाढ करून ४ हजार रुपयांऐवजी १0 ते १५ हजार रुपये वेतन द्यावे, एकरकमी पगार द्यावा, आजारपणाची रजा, उन्हाळ्याची एक महिन्याची सुट्टी, मुलांना पोषणआहार त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांकडे अंगणवाडी प्रकल्पाचे हस्तांतरण करण्याला विरोध, कंत्राटीकरणाला विरोध, मिनी अंगणवाडीचे मोठय़ा अंगणवाडीत रूपांतर करण्याची मागणी आदी मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो महिलांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनात राज्यभरातील १0 ते १२ संघटना सहभागी झाल्या होत्या. आपल्या मागण्या सन २00५ पासून प्रलंबित असल्याचे अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने सांगितले. या वेळी महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सचिवांनी दुपारी अंगणवाडी कर्मचार्‍यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले; परंतु मुख्यमंत्र्यांनी रात्री नऊ वाजल्यानंतरच शिष्टमंडळाला भेट देणार असल्याचे सांगितल्यामुळे कर्मचार्‍यांनी रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात ठाण मांडले होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS