भीमशक्तीचे शनिवारी ३५ जिल्ह्यांत लक्षवेध आंदोलन
3 /1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : दलितांच्या उत्थानासाठी राबवण्यात येणार्या विकास योजना सरकारच्या अनास्थेमुळे ठप्प पडल्या आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाजात सरकारविषयी कमालीची नाराजी पसरली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भीमशक्तीच्या वतीने शनिवार, ४ जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाच वेळी 'लक्षवेध आंदोलन' करण्यात येणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री असताना चंद्रकांत हंडोरे यांच्या कारकीर्दीत दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. त्या वेळी रमाई घरकुल योजना राबवण्यात आली. जास्तीत जास्त मागासवर्गीयांना याचा लाभ व्हावा, यासाठी एक लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो दलित कुटुंबांना हक्काचे घर मिळाले; परंतु या योजनेसाठी आता दारिद्रय़रेषेची अट घालण्यात आल्यामुळे लाखो कुटुंब या योजनेपासून वंचित राहिली आहेत.

याशिवाय स्वाभिमान योजनेंतर्गत हंडोरे यांच्या कार्यकाळात भूमिहिनांना १९ हजार एकर जमिनीचे वाटप करण्यात आले, मात्र सध्या ही योजना ठप्प अवस्थेत आहे. याशिवाय मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व योजनांना चालना देण्यात यावी, यासाठी शनिवारी भीमशक्तीच्या वतीने राज्यभर लक्षवेध आंदोलन छेडण्यात येणार आहे. राज्यातील ३५ जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करून त्यांना निवेदन दिले जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील सन २000 पर्यंत झोपड्यांना संरक्षण देण्यात यावे, झोपडी ट्रान्सफर जीआरची अंमलबजावणी व्हावी, क्लस्टर डेव्हलपमेंट योजना महाराष्ट्रातील सर्वच महापालिका परिक्षेत्रात राबवण्यात यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक तसेच शाहू महाराज (कोल्हापूर), अण्णा भाऊ साठे (मुंबई), महात्मा फुले (पुणे), छत्रपती शिवाजी महाराज (अरबी समुद्र) या महापुरुषांच्या प्रस्तावित स्मारकांना चालना द्यावी, या मागण्या या वेळी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment