3 /1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टीला' चांगले यश मिळाल्यामुळे आता या पक्षामध्ये पदवीधर तरुण-तरुणी मोठय़ा प्रमाणात प्रवेश करत आहेत. राज्यातील काही माजी सनदी व पोलीस अधिकारी या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडी सरकारने मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार तसेच कोट्यवधींचा घोटाळा केल्यामुळे हे दोन्ही पक्ष पुन्हा सत्तेत येतील की नाही, याबाबत या पक्षातील नेतेच संभ्रमात आहेत. या घोटाळ्यामुळेच 'आप'च्या रडारवर महाराष्ट्र राज्य अग्रक्रमावर असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. मुंबईत तसेच राज्यातील इतर भागांत 'आप'ची स्थापना झाल्यामुळे सर्वच पक्षांतील तरुणांचा ओढा मोठय़ा प्रमाणात या पक्षाकडे असल्याचे कळते.
आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल अंशत: स्वीकारण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतल्यामुळे हे सरकार आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता दिसते. या प्रकरणातून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना सहिसलामत बाहेर काढण्यासाठी या अहवालातील शिफारशी अंशत: स्वीकारण्याचे धोरण सरकारचे असल्यामुळे या घोटाळ्यात अडकलेले व शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आलेल्या बड्या सनदी अधिकार्यांना अडकवण्याच्या सरकारच्या धोरणामुळे आता हे अधिकारी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. मंत्र्यांच्या आदेशावरून आम्ही या इमारतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षर्या केल्या, मात्र मंत्र्यांना अभय देऊन आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सनदी अधिकार्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.

No comments:
Post a Comment