17/1/2014
मुंबई - जेष्ठ कवी, साहित्तिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबई महानगर पालिकेने मुंबई शहरात ढसाळांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी पालिकेतील अपक्षांचे गटनेते मनोज संसारे यांनी नामदेव ढसाळ, माजी नगरसेवक तुकाराम कांदळकर, विजय वासर्डे यांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहताना केली.
संत तुकाराम यांच्या नंतर विद्रोही साहित्तिकांमध्ये ढसाळांचे नाव घेतले जाते. संत तुकाराम यांच्यापासून ढसाळां पर्यंत सर्वच विद्रोही साहित्तिक कवी यांचे मुंबई महानगर पालिकेने कला दालन उभारावे असे संसारे म्हणाले.
नामदेव ढसाळ यांनी सर्व विरोध डावलून शिवशक्ती भीमशक्तीची सुरुवात केली होती. यावेळी ढसाळांवर दलितांचा दलाल अशी टीका करण्यात आली होती. तरीही ढसाळांची शिवशक्तीने नेहमीच उपेक्षा केली होती.
ढसाळ यांच्यावर दलाल अशी टीका करणारे स्वतःच आता खासदारकीसाठी शिवशक्तीच्या मागे धावत आहेत. ढसाळ आजारी होते त्यावेळी हे नेते त्यांना हॉस्पिटल मध्ये पाहायला सुद्धा गेले नाहीत असे संसारे म्हणाले.
ढसाळ यांचे साहित्त्य क्षेत्रात केलेल्या कामाची पोच म्हणून ढसाळ यांच्या नावे नवोदित साहित्तिक व कविना मुंबई महानगर पालिकेद्वारे पुरस्कार दिला जावा, त्यासाठी पालिकेने बजेट मध्ये भरीव तरतूद करावी अशी मागणी संसारे यांनी केली.

No comments:
Post a Comment