आश्रमशाळा कर्मचार्‍यांचे आमरण उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2014

आश्रमशाळा कर्मचार्‍यांचे आमरण उपोषण

18/1/2014मुंबई : राज्यातील २८८ अनुसूचित जाती आश्रमशाळांना अनुदान मिळण्यासाठी कर्मचार्‍यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या आश्रमशाळांची अनुदानाची मागणी मोठय़ा कालावधीपासून प्रलंबित असून ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात सन २00२ पासून अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकरता स्वयंसेवी संस्थांनी आश्रमशाळांना मान्यता दिल्या. त्यानंतर २६ जुलै २0१0 रोजी कर्मचारी संच आणि वैयक्तिक मान्यता देण्याचा शासन निर्णय घेण्यता आला. त्यानतंर कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय आणि इतर विभाग प्रमुखासह मुख्यमंत्र्यांच्या दालनात १५ फेब्रुवारी २0१२ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ५0 कोटी रुपये इतक्या तरतुदीच्या अनुषंगाने संबंधित आश्रमशाळांची गुणात्मक तपासणी करून अ, ब, क, ड अशा वर्गवारीसह छाननी करावी आणि या वर्गातील आश्रमशाळांना अनुदान देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ही तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यासाठी आदेशही निर्गमित करण्यात आले; परंतु याप्रकरणी कुठल्याही प्रकारची कार्यवाही मात्र अद्याप झाली नसून या आश्रमशाळांतील कर्मचारी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे पवित्र कार्य करत आहेत. या आश्रमशाळांना अनुदान देऊन या शाळांतील कार्यरत चार ते पाच हजार कर्मचार्‍यांवरील उपासमार बंद करावी, या मागणीसाठी राज्यातील २८८ आश्रमशाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS