आमदारांच्या त्रासाला कंटाळून शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे राजीनामा देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2014

आमदारांच्या त्रासाला कंटाळून शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे राजीनामा देणार


Inline images 1

16/1/2014
मुंबई - शिवसेनेचा रस्त्यावरचा राडा आतापर्यंत सर्वांना माहीत होता, पण आमदार विरुद्ध नगरसेविका अशी जोरदार लढाई सध्या दहिसरमध्ये बघायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे ‘विकृत राक्षस’ असल्याचा आरोप करत याच पक्षाच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. फक्त माझ्याच बाबतीत नव्हे, तर शिवसेना महिला पदधिकारी तसेच इतर नगरसेविकांनाही घोसाळकरांच्या विकृतपणाचा प्रचंड त्रास होत आहे, असा घरचा आहेर देण्यासही म्हात्रे विसरल्या नाहीत. 
 
या प्रकाराला पार्श्वभूमी आहे ती दहिसरच्या स्वच्छतागृहातील आक्षेपार्ह मजकुराची. स्वच्छतागृहात शीतल म्हात्रे व शुभा राऊळ यांचे मोबाइल क्रमांक देण्यात आले होते. या क्रमांकामुळे दोन्ही नगरसेविकांना आक्षेपार्ह फोन येऊ लागले. परिणामी आपल्याला प्रचंड त्रास होत असून या प्रकाराविषयी दोन्ही नगरसेविकांनी मातोश्रीवर धाव घेऊन आपल्याला न्याय द्या, अशी विनंती केली. 

प्रसंगी दोघींनीही सोशल साइटवरून झाल्या प्रकाराची वाच्यता करून ‘द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णा धाव’ अशी आर्जवही केली. विनंती करून, धावा करून शिवसेना पक्षप्रमुखाच्या कानी आपले गार्‍हाणे जात नाहीत हे लक्षात येताच म्हात्रे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. ‘मीच नव्हे, तर गोरेगावपासून पुढे दहिसरमध्ये शिवसेनेतील प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आमदारांच्या दडपणाखाली आहे. ते म्हणतील तीच पूर्व दिशा आहे. दरम्यान आपल्यावर झालेले आरोप निराधार असून आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेऊन, असे विनोद घोसाळकर यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS