10/1/2014
नाशिक- पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे, त्याला सर्व राज्ये समान वाटली पाहिजेत, मात्र मोदी जिकडे जातील तिकडे फक्त आपल्या गुजरातचा दिंडोरा पिटत आहेत, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली.

राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौ-यावर आले असून राज यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला.
पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होताच मोदींनी मुख्यमंत्रीपद सोडून देशाचा विचार करायला हवा होता. दुस-या राज्यात जाऊन टिका करणा-या मोदींनी आपण फक्त एका राज्याचे नव्हे तर देशाचे प्रतिनिधित्व करतो आहोत याचा मोदींनी विचार करायला हवा, असे खडे बोल सुनावले.
मोदींनी मुंबईत येऊन गुजरातचे गुणगान गायले, गुजराती भाषिकांबाबत बोलले, वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याबाबत बोलले, मग त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतही बोलायला हवे होते. असा दुजाभाव मोदींनी करु नये, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठींबा देणार का, असा प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी तुर्तास पाठींबा देणार नाही असे स्पष्ट सांगितले. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातील राजकारणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात त्यांचा नेता कोण आहे, त्यांचे येथे काही चालणार नाही. माझ्याही सभांना गर्दी होते, महाराष्ट्रात ‘आप’ची जादू चालणार नाही, दिल्लीत आप तर इथे आम्ही बाप आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment