10/1/2014
मुंबई : मुंबईत महानगरपालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा यांच्या दर्जात मोठी तफावत असून पालिका शाळांसाठी मास्टर प्लॅन आणावा, अशी विनंती मुंबईतील पालकांनी पालिकेला केली आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात ही मागणी पालकांनी केली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खालावत चालल्याचे पालकांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती वाढत चालली असल्याचेही पालकांनी नमूद केले.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांचाही अभाव असून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षणही दिले जात नसल्याचे पालकांनी सांगितले. खाजगी आणि सरकारी अनुदानित शाळांच्या दर्जात फार मोठी तफावत असून या अंतराचा विचार मुंबई महानगरपालिकेने कधीही केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेकडून वीस वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत भरीव तरतूद करण्यात यावी. तसेच याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहनही पालकांनी या वेळी केले. परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित विकास आराखडा कार्यशाळेत पालकांनी हजेरी लावली होती. या कार्यशाळेत पालकांनी पालिकेच्या शाळांच्या खालावत चाललेल्या दर्जाबाबतचा पाढाच वाचला. त्याचबरोबर हा दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने ठोस पाऊल उचलायला हवे, असेही पालकांनी या वेळी नमूद केले.

No comments:
Post a Comment