बेस्टच्या उत्पन्नात बनावट नोटांचा भरणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2014

बेस्टच्या उत्पन्नात बनावट नोटांचा भरणा

10/1/2014
मुंबई : बेस्ट बसने प्रवास करीत असताना तिकीट काढण्यासाठी सुट्टे पैसे देण्याचा आग्रह नेहमी वाहकांकडून (कं डक्टर) केला जातो. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा रागही येतो. परंतु प्रवाशांनो, रागवू नका कारण बेस्टच्या वाहतूक विभागातील उत्पन्नात बनावट नोटांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २0१२ मध्ये बेस्टच्या वाहतूक विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी १ लाख ७0 हजार रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. या बनावट नोटांमध्ये ५00 आणि १000 रुपयांच्या नोटांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बेस्टचे वाहक ५00 आणि १000 च्या नोटा घेत नाहीत.

मुंबई आणि परिसरात बेस्टची बस धावते. बेस्टच्या सर्व २५ बस डेपोंमध्ये जमा होणारे परिवहन विभागाचे उत्पन्न दररोज आयसीआयसीआय आणि बँक ऑफ इंडिया या बँकेकडे जमा करण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २0१२ या वर्षात वाहतूक विभागातर्फे १२५0 कोटी रुपये उत्पन्न आयसीआयसीआय आणि बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे. त्यातील १ लाख ७0 हजार ९00 रुपयांच्या नोटा या बनावट असल्याचे आयसीआयसीआय बँकेने बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामध्ये १ हजार, ५00 आणि १00 च्या नोटांचा समावेश आहे. या रकमेपैकी १ लाख ३ हजार १00 रुपये एवढी रक्कम आयसीआयसीआय बँकेकडून वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नात घट होत आहे.

बनावट नोटांची संख्या
महिना   १ हजार रु.   ५00 रु.   १00 रु. एकूण रुपये
जानेवारी    0         १६       0     ८000
फेब्रुवारी     0         १७       १     ८६00
मार्च       0         १६       ३     ८३00
एप्रिल      २         २३       0    १३५00
मे         0         १३       0     ६५00
जून        ५        ३४       0    २२000
जुल        ५        २0       0    १५000
ऑगस्ट     ७         १६       ४    १५४00
सप्टेंबर     १         २४       २२   १५२00
ऑक्टोबर    ५        २९       ५१    २४६00
नोव्हेंबर     ३        २0       ५५    १८५00
डिसेंबर      ३        १५       ४८    १५३00
एकूण      ३१       २४३      १८४   १,७0,९00

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS