10/1/2014
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांची संख्या व जागा निश्चितीबाबत येत्या चार महिन्यांत निर्णय घेणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. फेरीवाल्यांची संख्या तसेच त्यांच्या जागा निश्चितीसाठी टाऊन वेडिंग कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ३५ सदस्यांची ही कमिटी बनवण्यात आली असून, त्यात परिवहन, पोलीस, स्वयंसेवी संस्था, फेरीवाल्यांची संस्था, मनपा अधिकारी आदींचा समावेश आहे. लोकसंख्येनुसार फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्याचे तसेच कोणत्या ठिकाणी फेरीवाल्यांना जागा द्यायची याची यादी निश्चित करण्याचे निर्देश या वेळी आयुक्त कुंटे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.


No comments:
Post a Comment