म्हाडा कॉल सेंटरचे १0 फेब्रुवारी रोजी उद््घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 February 2014

म्हाडा कॉल सेंटरचे १0 फेब्रुवारी रोजी उद््घाटन

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या विविध मंडळाची माहिती केवळ एका फोनवर उपलब्ध करण्याच्या म्हाडा कॉल सेंटरचा शुभारंभ १0 फेब्रुवारी रोजी होणार आहे. म्हाडा उपाध्यक्षांच्या हस्ते हा औपचारिक उद््घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. 

म्हाडाच्या माध्यमातून दरवर्षी पार पडणारी परवडणार्‍या घरांची सोडत, संक्रमण शिबिरे, मास्टर लिस्ट यादी अशा सर्वसामान्यांच्या उपयुक्ततेच्या कामांची माहिती कॉल सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या पूर्वी पार पडलेल्या सोडतीची माहिती, त्यातील विविध प्रक्रिया तसेच आगामी सोडत, त्यांची प्रक्रिया, कागदपत्रांची माहिती, कोणताही संबंधित अर्ज कसा भरावा याची माहिती या कॉल सेंटरमधून सेवा सुविधा या फोनच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हाडाच्या ९८६९९८८000 या कॉल सेंटर क्रमांकाचा वापर सर्वसामान्यांना म्हाडाची माहिती व विविध सेवा पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे.

मे २0१३ मध्ये काढलेल्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांसाठी म्हाडाने पोस्ट लॉटरी सॉफ टवेअर तयार केले आहे. यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्याची सुविधा सोमवारपासून म्हाडा संकेतस्थळावर सूरू होत आहे. विजेत्यांना पाठविण्यात आलेल्या प्रथम सूचनापत्रानुसार अर्जदारंनी संकेतस्थळावर भेट देउून आवश्यक ती माहिती भरून कागदपत्रे अँक्सिस बॅकेत जमा कराण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS