| मुंबई : एसटी कर्मचार्यांच्या २0१२ ते २0१६ या वेतन करारातील सुमारे ५५0 कोटी रुपयांची थकबाकी कर्मचार्यांना अद्याप दिलेली नाही. त्यामुळे येत्या १0 फेब्रुवारी रोजी एसटीतील कर्मचारी सामूहिक रजा काढून एसटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना भेटण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवन येथे येणार आहेत. त्यामुळे एसटीच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. एसटी कर्मचार्यांच्या २0१२ ते २0१६ या चार वर्षांच्या वेतन करारातील सुमारे ५५0 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच वेतन कराराच्या तरतुदीनुसार जानेवारी ते सप्टेंबर २0१३ या ९ महिन्यांच्या ८ टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी ७२ कोटी रुपये तर जुलै ते ऑक्टोबर २0१३ या ४ महिन्यांच्या १0 टक्के वाढीव महागाई भत्त्याची ४0 कोटी रुपयांची थकबाकी अशी एकूण वाढीव महागाई भत्त्यापोटी ११२ कोटी रुपयांची थकबाकी कर्मचार्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी असून प्रलंबित रकमेचे १0 फेब्रुवारीपूर्वी वाटप करण्यात यावे, असे लेखी पत्र १६ जानेवारी रोजी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयात एसटी कर्मचार्यांच्या महत्त्वाच्या निरनिराळय़ा प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेऊन वेळेवर अंमलबजावणी होत नाही, करार-कायदे यांचा भंग करून निर्णय घेतले जातात. या सर्व मागण्या मान्य न झाल्यास १0 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुसंख्य कर्मचारी रजा काढून मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवन येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिली. त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. |
Post Top Ad
05 February 2014
Home
Unlabelled
एसटी कर्मचार्यांचे सोमवारी सामूहिक आंदोलन
एसटी कर्मचार्यांचे सोमवारी सामूहिक आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment