| मुंबई : परिवहन विभागाने राज्यातील आरटीओ कार्यालयांमधून ६९ हजार रिक्षांची परमिट देण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रि येस सुरुवात केली आहे. सोमवार, २७ जानेवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३१ जानेवारी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ६९ हजार ऑनलाइन अर्ज भरले गेले आहेत. तर त्यातील ५६ हजार अर्जांचे प्रक्रिया शुल्कही (प्रत्येकी १00 रु. प्रमाणे) जमा झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगर प्रदेशात ४५ हजार अर्ज भरले गेले आहेत. पहिल्या दिवशी अर्जदारांना काही तांत्रिक अडचणी येत होत्या; परंतु २८ जानेवारीपासून सर्व प्रक्रिया सुरळीत झाली. पहिल्या दिवशी १२ हजार, दुसर्या दिवशी २0 हजार, तिसर्या दिवशी १७ हजार, तर चौथ्या दिवशी १५ हजार अर्ज ऑनलाइन भरले गेले. अर्ज भरताना मार्गदर्शन हवे असेल तर हेल्पलाइन क्रमांक (0२२-६१३१६४00) वरून ऑनलाइनचे व परिवहन विभागाच्या अधिकार्यांमार्फत सकाळी ९.३0 ते रात्री ९.३0 वाजेपर्यंत हेल्पलाइनवरून माहिती दिली जात आहे. पहिल्या पाच दिवसांतच अनेक आरटीओ कार्यालयांसाठी हजारोंच्या संख्येने ऑनलाइन अर्ज भरले गेले आहेत. हे अर्ज राज्यातील सहा हजारांपेक्षा जास्त ई-सेवा केंद्रांमधून भरण्याची सोय आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. |
Post Top Ad
01 February 2014
Home
Unlabelled
रिक्षा परमिटला भरघोस प्रतिसाद
रिक्षा परमिटला भरघोस प्रतिसाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment