| मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेनलाइन आणि हार्बर मार्गावर रविवार, २ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेनलाइनवर भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. मेनलाइनवर भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १0.३0 ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्म २ आणि ३ च्या मध्ये पादचारी पुलाचा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या विद्याविहार स्थानकात थांबणार नाहीत. तसेच भायखळा ते विद्याविहार दरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. दरम्यान, या लोकल गाड्यांना परेल, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवरील वाहतूक सुमारे १५ ते २0 मिनिटे उशिराने होणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पनवेस ते नेरूळ स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी ११.0५ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत आणि पनवेल ते अंधेरी लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे २0 मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉक काळात लोकल गाड्या सुमारे १५ ते २0 मिनिटे उशिराने धावतात. परिणामी, गाड्यांना प्रचंड गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड गर्दी असलेल्या लोकलमधून प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
|
Post Top Ad
01 February 2014
Home
Unlabelled
मरेचा मेगाब्लॉक - परेचा जम्बोब्लॉक
मरेचा मेगाब्लॉक - परेचा जम्बोब्लॉक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment