मुंबई : मोनोरेलच्या आगमनावरून मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केलेल्या निवेदनावरून सभागृहात गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मोनोरेल सुरू केल्याबद्दल आंबेरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले, तर निवडणुका जवळ येत असल्याने काँग्रेसने घाईघाईने मोनोरेलचे उद््घाटन केले, असा आरोप सत्तारूढ शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या सेवेचे उद््घाटन करताना एमएमआरडीएने नगरसेवकांना आमंत्रित न केल्याबद्दल सर्व नगरसेवकांनी नाराजीचा 'एक सूर' आळवला.
मोनोरेलच्या उद््घाटनाविषयी काँग्रेसचे आंबेरकर यांनी निवेदन करताना सांगितले, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर पडणारा ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने परिवहन सेवेचा सखोल अभ्यास करू न अंधेरी ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे आणि जेकब सर्कल ते चेंबूरपर्यंत मोनोरेल प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यानुसार वडाळा ते चेंबूरपर्यंत पहिला टप्पा सुरूझाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले. मोनोरेलची संकल्पना प्रथम बेस्टने मांडली होती, असेही ते म्हणाले. 'मोनोरेलचे काम इतकी वर्षे सुरू आहे; पण त्यापैकी फक्त आठ किलोमीटरचा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू करून काय साधले? असा मुद्दा सभागृह नेते यशोधर फणसे यांनी मांडला. निवडणुका जवळ आल्याने श्रेय घेण्यासाठीच काँग्रेसने मोनोरेल सुरू केली आहे; पण मोनोरेलचा संपूर्ण मार्ग सुरू न झाल्याबद्दल काँग्रेस काहीच बोलत नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी भारतातून बरेच पर्यटक मुंबईत मोनोरेलच्या आकर्षणामुळे येत आहेत; पण येथे त्यांना फिरण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते नसून ही शरमेची बाब आहे. मोनोरेलचे प्रवाशांनी चांगलेच स्वागत केले असून, लवकरच मेट्रो रेल्वेही येणार आहे. मुंबईत येणार्या या नव्या प्रकल्पांचे स्वागत झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment