| मुंबई : मोनोनंतर आतुरतेने वाट पाहणार्या मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो येणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रोचे अवघे पाच टक्के काम अपूर्ण आहे. लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लि.चे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो मार्ग ११.४0 किमीचा आहे. या मार्गिकेत एकूण १२ स्थानके आहेत. सध्याच्या घडीला मेट्रोचे ९४.६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. कोणत्याही स्थानकाचे शंभर टक्के काम पूर्ण झालेले नाही. वर्सोवा, डी. एन. नगर आणि आझाद नगर या तीन स्टेशनचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे,तर असल्फा रोड आणि जागृती नगर या स्थानकांचे जवळपास २0 टक्के काम अपूर्ण आहे.(डिसेंबर, २0१३ पर्यंतची माहिती). वर्सोवा ते विमानतळ मेट्रो स्टेशन या पहिल्या टप्प्यास सात वेळा तर विमानतळ मेट्रो स्टेशन ते घाटकोपर मेट्रो स्टेशनपर्यंतच्या दुसर्या टप्प्यास डिसेंबर, २0१३पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. मेट्रोच्या सर्व स्थानकांचे काम पूर्ण होईपर्यंत उद््घाटन करण्यात येऊ नये, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे केली आहे. |
Post Top Ad
07 February 2014
Home
Unlabelled
मुंबई मेट्रो मार्च महिन्यात धावणार
मुंबई मेट्रो मार्च महिन्यात धावणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment