सीएसटी स्थानकात नवा पादचारी पूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 February 2014

सीएसटी स्थानकात नवा पादचारी पूल

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्म्सना जोडणारा नवा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या नव्या पुलामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते १८ हे सर्व प्लॅटफॉर्म पूर्णपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यांप्रमाणे लोकल प्रवाशांना वळसा घालण्याचा त्रास वाचणार आहे. सध्या या पुलाचे काम जोरात सुरू असून तो १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीएसटी स्थानकात मस्जिद बंदरच्या दिशेने हा पूल उभारण्यात येत आहे. या सुविधेमुळे १५, १६, १७, १८ क्रमांकावर जाण्यासाठी प्रवाशांना पार्सल ऑफिसकडून जवळपास पाऊण किमीचा वळसा घालावा लागतो. तसेच या प्रवाशांना लोकल पकडण्यासाठीही फिरून यावे लागते. या पुलाचा खर्च सुमारे ७ कोटी रुपये असून त्याची लांबी २७0 मीटर एवढी आहे. त्यासाठी ११ खांब उभारण्यात येत आहेत. त्यामुळे उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS