मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रवीण पुरो - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 February 2014

मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रवीण पुरो

मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी प्रवीण पुरो, तर कार्यवाहपदी मंदार पारकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष म्हणून महेश पवार यांची निवड झाली आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रवीण पुरो यांना ३0, उदय तानपाठक यांना २९, सदानंद शिंदे यांना २८, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र थोरात यांना १६, तर सदानंद खोपकर यांना १२ मते मिळाली. कार्यवाहपदाची लढत पूर्णपणे एकतर्फी झाली. मंदार पारकर यांनी कार्यवाहपदी सलग दुसर्‍यांदा निर्विवाद विजय मिळविला. मंदार पारकर यांना ९१ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजीवन ढेरे यांना केवळ २३ मतांवरच समाधान मानावे लागले. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निकराच्या लढाईत प्रमोद डोईफोडे यांना ४१, खंडुराज गायकवाड ३९, दिलीप जाधव ३२ मते मिळाली. कोषाध्यक्षपदासाठी झालेल्या लढाईत विद्यमान कोषाध्यक्ष महेश पवार ६१ मते मिळवून विजयी झाले, तर पुरुषोत्तम आवारे-पाटील यांना ५२ मते मिळवत पराभव पत्करावा लागला. कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या पाच जागांसाठी झहीर सिद्धिकी ६७, प्रफुल्ल साळुंखे ६६, शामसुंदर सोन्नर ५९, प्रवीण राऊत ५९, तर डॉ. नितीन तोरस्कर ५४ मते मिळवून विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनय खरे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS