मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह वाहत असतो, त्यामुळे रेल्वेच्या टपावरून प्रवास करू नये असे कितीही बजावून सांगितले तरी रेल्वे टपावरून प्रवास करणार्यांची संख्या काही कमी होत नाही. उपनगरीय रेल्वेवर आठवड्यातून एक दिवस तरी टपावरून प्रवास करणार्या या टपोरींच्या स्टंटगिरीमुळे लोकलची वाहतूक विस्कळीत होते. टपावरून स्टंटगिरी करणार्यांची सर्वाधिक संख्या आहे ती हार्बर मार्गावर.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या १३ दिवसांमध्ये रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत १७५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.मध्य रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायरमधून १५00 व्होल्ट विद्युत प्रवाह प्रवाहित होत होता, परंतु आता १२ जानेवारीपासून २५ हजार व्होल्ट विद्युत प्रवाह प्रवाहित होत आहे. त्यामुळे लोकलच्या टपावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. असे असले तरी लोकलच्या टपावरून स्टंटगिरी करीत प्रवास करणार्या तरुणांची संख्या काही कमी होत नाही. प्रामुख्याने हार्बर मार्गावर या टपोरींची संख्या जास्त आहे.
लोकलच्या टपावरून प्रवास करीत असताना विद्युत प्रवाहाच्या सान्निध्यात आला तर त्याचा जागीच कोळसा होतो. त्यामुळे लोकलची वाहतूकही विस्कळीत होते. अशा अपघातांमध्ये त्या टपोरीला काढण्यासाठी रेल्वेचा विद्युत प्रवाह खंडीत करावा लागत असला तरी तेही अत्यंत जोखमीचे काम असते. लोकलच्या टपावरून प्रवास करीत स्टंटगिरी करणार्या अशा टपोरींच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या १३ दिवसांत कारवाई केली होती. त्यामध्ये १७५ जणांना अटक करण्यात आली होती. रेल्वे न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळय़ा दंडानुसार त्यांच्याकडून २७ हजार ७00 रुपये दंडही वसूल करण्यात आला होता. या कारवाईत वडाळा,मानखुर्द, नाहूर आणि ठाणे या स्थानकांत सर्वाधिक टपोरी पकडण्यात आले होते. त्यामुळे लोकलच्या टपावरून प्रवास करून मृत्यूला आमंत्रण देऊ नका, असे आवाहन रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment