पालिकेचा शिक्षण अर्थसंकल्प बुधवारी मांडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 February 2014

पालिकेचा शिक्षण अर्थसंकल्प बुधवारी मांडणार

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षापेक्षा १५ टक्के अधिक अर्थसंकल्पीय तरतूद वाढण्याची शक्यता आहे. तसेच आठवी ते दहावीपर्यंतच्याही शाळा सुरू करण्याचा, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत देण्यात येणारे सुगंधी दूधही बंद करण्याचा, प्री प्रायमरी व इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळाही सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव असल्याचे समजते. 

विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका सध्या पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण देते, पण यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्री प्रायमरी आणि आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण देण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीकडे मांडण्यात येणार आहे. या वर्षापासून उर्दू आणि अन्य भाषिक अल्पसंख्याक शाळांची संख्या कमी करून, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी शाळांची संख्या ९४ वरून ३00 पर्यंत वाढवण्याचा आणि महापालिकेच्या शाळांना दरवर्षी देण्यात येणार्‍या २७ शालोपयोगी वस्तूऐवजी रोख रक्कम देण्याचाही प्रस्ताव यंदाच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. गेल्या वर्षी तीन हजार १00 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता, यंदाचा अर्थसंकल्प सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा असेल, असे समजते. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये इंटरनेट आणि संगणक देण्याचीही योजना आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS