अर्जच न आलेल्या १ हजार ४६८ जागांसाठी ऑनलाइनचा दुसरा टप्पा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2014

अर्जच न आलेल्या १ हजार ४६८ जागांसाठी ऑनलाइनचा दुसरा टप्पा

मुंबई - आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के कोट्याद्वारे ३ हजार ५०० विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दारे खुली झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आज ५७ खासगी शाळांतील १ हजार ५६९ जागांसाठी ऑनलाइन लॉटरी जाहीर झाली तसेच १७१ शाळांमधील ५ हजार १८६ जागांसाठी अर्ज केलेल्या १ हजार ८११ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे प्रवेश देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी २० मेपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. या विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी शाळांचीच असणार असून दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेणार्‍या विद्यार्थ्यांचे नाव बाद होणार आहे. ८४ शाळांमधील १ हजार ४६८ जागांसाठी एकाही विद्यार्थ्यांने अर्जच केलेला नाही. या जागांसाठी ऑनलाइन प्रवेशाचा दुसरा टप्पा राबविण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार आहे. मात्र यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. आज नाव निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या टप्प्याच्या तारखा ठरवल्या जातील.

प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरीऑनलाइन लॉटरी पद्धतीत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीची दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. मात्र या फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळांच्या पसंतीक्रमात एकापेक्षा जास्त पर्याय देणे आवश्यक आहे. फक्त एकच पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळणार नाही, असे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS