बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार लांबणीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2014

बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार लांबणीवर

मुंबई : बँक आणि मुंबई महापालिकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यातच बेस्टच्या तिजोरीतील पैसे जात आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांचा एप्रिल महिन्याचा पगार लांबणीवर पडला आहे. तिजोरीत पगार देण्याइतकी रक्कम नसल्यामुळे बेस्ट प्रशासनावर ही वेळ आली आहे. 
बेस्ट उपक्रम कर्जाच्या ओझ्याखाली वाकले आहेत. बेस्टने मुंबई महानगरपालिकेसह विविध बँकांमधून सुमारे ३ हजार १0३ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जामुळे दर महिना सुमारे २६ कोटी रुपये व्याज बेस्ट प्रशासनाला भरावे लागते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे बेस्टला आपल्या कारभाराचा गाडा चालविणे अशक्य झाले आहे. महापालिकेकडून घेतलेल्या १ हजार ६00 कोटी कर्जाचा हप्ता सुरू झाला आहे. 

त्यामुळे दर महिन्याला २0 कोटी रुपये भरावे लागतात. नोव्हेंबरपासून दर महिना ४१ कोटी रुपयांचा हप्ता द्यावा लागणार आहे. कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी किमान १६0 कोटी रुपये असणे आवश्यक आहे, पण या वेळी भविष्य निर्वाह निधीची रक्कम उशिरा भरून उर्वरित ८0 ते ८५ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. यापूर्वी कर्मचार्‍यांचा पगार ५ मे रोजी होत असे. बेस्टच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार १0 तारेखपूर्वी कर्मचार्‍यांना पगार देणे बंधनकारक आहे.

बँकांचे कर्ज : १ हजार ३८0 कोटी ८0 लाख रुपये
मुंबई महापालिका कर्ज : १ हजार ६00 कोटी रुपये
टाटाचे थकीत बिल : १२२ कोटी ७६ लाख रुपये

Post Bottom Ad

JPN NEWS