पालिका मुख्यालय धोकादायक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2014

पालिका मुख्यालय धोकादायक

Displaying IMG-20140508-WA0012.jpg
जनसंपर्क विभागातील शौचालयाचे स्ल्याब कोसळले 
स्ल्याब मधून पाण्याच्या धारा
मुंबई / अजेयकुमार जाधव  http://jpnnews.webs.com
धोकादायक इमारती खाली करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून सपाटा लावला असतानाच पालिकेच्या मुख्यालयामध्ये सिलिंग पडणे पाणी टपकने याकडे मात्र पालिका दुर्लक्ष करत असल्याने पालिकेच्या मुख्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कधीही अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
मुंबई महानगर पालिकेने मुंबईमधील धोकादायक इमारतींना अपघात होण्याची इमारती पडण्याची शक्यता असल्याने खाली कण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पालिकेने इमारती खाली करण्याची नोटीस दिली आहे. एकीकडे पालिका इतर इमारतींना खाली करण्याची नोटीस देत असतानाच पालिकेच्या मुख्यालयामध्ये असलेल्या कार्यालयांकडे दुर्लक्ष करत आहे.पालिकेच्या जनसंपर्क विभागाचे कार्यालय पालिका मुख्यालयामध्ये आहे. या कार्यालयाच्या शौचालयामधील सिलिंग पडले आहे. सिलिंग पडून एखादा अपघात होऊ नये म्हणून सिलिंगला लोखंडी खांबाचा टेकू देण्यात आला आहे. शौचालयामध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पाणी टपकत असल्याने हे सिलिंग कोसळले असल्याची माहिती मिळत आहे.

जनसंपर्क विभागात काम करणारे अधिकारी,कर्मचारी, तसेच काही पत्रकार या शौचालयाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशा परिस्थिती मध्ये एखादा अपघात झाल्यास जनसंपर्क विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकारांना दुखापत होण्याची, वेळ प्रसंगी जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका इतर इमारतींना धोकादायक ठरवून इमारती खाली करत असताना आपल्या मुख्यालयाकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी पालिकेने स्वताच्या मुख्यालयातील धोकादायक जागांची आधी डागडुजी करावी नंतरच इतरांना इमारती खाली करण्याचे सल्ले द्यावेत अशी दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS