जात प्रमाणपत्रासाठी तीन महिने मुदतीवर प्रवेश देण्याचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2014

जात प्रमाणपत्रासाठी तीन महिने मुदतीवर प्रवेश देण्याचे आदेश

मुंबई - 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र तीन महिन्यांत प्राप्त करण्याच्या अटीवर प्रवेश देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. यासोबतच एआरसीमध्ये कागदपत्र पडताळणी आणि अर्ज दाखल करण्यास 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्‍ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशेच्छू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, तंत्रशिक्षण संचालनालयाने हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी केवळ 10 दिवसांची मुदत दिली होती, जी आजच संपली. या संदर्भात विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची भेट घेतली. तावडे यांनी या संदर्भात तंत्रशिक्षण संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर वरील आदेश निघाला. मागील वर्षीही प्रवेशांच्या अखेरपर्यंत हे प्रमाणपत्र सादर करणे तंत्रशिक्षण संचालनालयाने अनिवार्य केले होते आणि अनेक विद्यार्थ्यांना ते विहीत मुदतीत सादर करता आले नव्हते.

Post Bottom Ad

JPN NEWS