मुंबई : म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळ्यापूर्वीच्या सर्वेक्षणानुसार अतिधोकादायक इमारतींची यादी शुक्रवारी मंडळाचे मुख्य अधिकारी मोहन ठोंबरे यांनी जाहीर केली. या यादीनुसार यंदा ८ इमारतींचा समावेश अतिधोकादायक इमारतींमध्ये करण्यात आला असून यापैकी ३ इमारती गेल्यावर्षीच्या धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये समाविष्ट होत्या. गेल्या दीड वर्षातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचे प्रमाण घटले आहे.
अनधिकृत रहिवाशांवर योग्य वेळेस केलेल्या कारवाईचा परिणाम असल्याचे सांगत यंदाही ७ जूनपूर्वी अनधिकृत रहिवाशांना पोलिसांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात येणार असल्याचे ठोंबरे यांनी या वेळेस स्पष्ट केले. अतिधोकादायक इमारतींच्या यादीनुसार कुलाबा विभागातील १४४, एम. जी. रोड, एक्स्प्लेनेंड मेन्शन, चंदनवाडी विभागातील ४२-४८, मंगलदास रोड व १-१३ विठ्ठलदास रोड, २३0/२३४ संत सेना महाराज मार्ग, ताडदेवमधील गोरागांधी चाळ, करीम इमारत, बादशहा इमारत, ३९ चौपाटी सी फेस रोड व परळमधील मोतीराम दयाराम चाळ या इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमध्ये २१५ निवासी व २१0 अनिवासी रहिवासी आहेत.

यापैकी काही अधिकृत असून बहुतांश घुसखोर आहेत. या घुसखोरांना ७ जून पूर्वी बाहेर काढण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यंदा केवळ २२ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. ताडदेवमधील बादशहा इमारतीमध्ये ३४ निवासींपैकी केवळ ४ अधिकृत असून उर्वरित घुसखोर घोषित करण्यात आले आहेत.या घुसखोरांना बाहेर काढणे हे आव्हान असल्याचे ठोंबरे यांनी या वेळेस स्पष्ट केले मात्र आम्ही हे आव्हान पार पाडू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. या वेळेस दुरुस्ती मंडळाचे सभापती प्रसाद लाड, उपमुख्य अधिकारी सुरवाडे, अभियंता वर्ग उपस्थित होते.
५ लाख रुपयांची विमा सुविधा
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या उपकर प्राप्त इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या घटनेतील मृतांसाठी ५ लाख, गंभीर दुखापतीसाठी ५0 हजार व २५ हजार रुपयांचा विम्याची तरतूद करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत १0 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड गुंतवणूक करण्यात आली आहे. अपघात होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असले तरीही रहिवाशांसाठी दिलासा देण्यात आला आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट महिनाभरात होणार पूर्ण
म्हाडाकडून बांधण्यात आलेल्या १५२ इमारतींपैकी ७0 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले असून ६५ इमारतींची जुजबी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. तर उर्वरित इमारतींचे काम महिनाभरात पूर्ण होणार असून ५ इमारतींची गंभीर दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले आहे.अनधिकृत रहिवाशांवर कारवाई करण्याचे आदेश