काँग्रेसचे आज सविनय कायदेभंग आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2014

काँग्रेसचे आज सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या प्रचंड रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोमवारी २३ जून २0१४ रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करणार आहे. या आंदोलनांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. प्रा. जनार्दन चांदूरकर यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, अनेक आमदार व पदाधिकारी सोमवारी सकाळी १0 वाजता मुंबई सीएसटी येथे निदर्शने करणार आहेत. त्यानंतर सर्व नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते मुंबई ते ठाणे दरम्यान विनातिकीट प्रवास करतील. या दरवाढीमुळे सामान्य जनतेत असलेला रोष व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. 
केंद्र सरकारने दरवाढ रद्द न केल्यास येत्या २५ जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनात स्वाक्षरी मोहीम राबवून त्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व केंद्र सरकारला पाठवले जाणार आहे. सोमवारी होणार्‍या विनातिकीट प्रवास सविनय कायदेभंग आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे. मात्र, निदर्शने करताना रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहचू नये, यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS