रेल्वेच्या नवीन डब्यांमध्ये सीसीटीव्ही लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेच्या नवीन डब्यांमध्ये सीसीटीव्ही लागणार

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comरेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी रेल्वे विभाग नवीन डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विचार करत आहे. रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सोमवारी या संदर्भात माहिती दिली. रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना 'रेल्वे मंत्रालय जवळपास १000 रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. हे कॅमेरे सुस्पष्ट आणि अत्याधुनिक राहतील,' असे रेल्वे पोलीस दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. रेल्वेमध्ये होणार्‍या चोरीच्या घटना आणि दरोडे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.सर्वप्रथम ही प्रक्रिया सर्वात जास्त गुन्हेगारी घटना असलेल्या भागांमध्ये सुरू केली जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages