खातेप्रमुखांना मिळणार टॅब्लेट पीसी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खातेप्रमुखांना मिळणार टॅब्लेट पीसी

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमुंबई महापालिकेतील विविध खात्यांच्या आणि विभागांच्या प्रमुखांना दैनंदिन वापरासाठी एकूण १00 विंडोज् टॅब्लेट पीसी मिळणार आहेत. संगणकीकरणाचा भाग म्हणून सर्व विभागांसाठी 'ई ऑफिस'(पेपरलेस ऑफिस) या संगणक प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या खातेप्रमुखांना बहुतेक वेळा विविध बैठका आणि साईट व्हिजीटसाठी कार्यालयाबाहेर जावे लागते. या वेळेत खातेप्रमुखांना संगणकीय कामकाज करणे सोयीस्कर होण्यासाठी हलके व सोपे असे विडोज् टॅब्लेट खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रत्येक टॅब्लेट पीसीची किंमत ७0 हजार रुपये आहे. हे 'पीसी' खरेदी करण्यासाठी पालिका तब्बल ७१ लाख रुपये खर्च करणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages