पालिका रुग्णालयातील डॉक्टरांची तपासणी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2014

पालिका रुग्णालयातील डॉक्टरांची तपासणी होणार

मुंबई महानगर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे कामाचे तास कमी करून त्यांचा आरोग्याची वार्षिक तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पालिका सभागृहात स्पष्ट केले आहे. 
पालिका रुग्णालयातील आरोग्य सेवेचे आधारस्तंभ आहेत. निवासी डॉक्टरांना दहा तासापेक्षा जास्त काम करावे लागत असल्याने त्यांचे स्वताच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असते. निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण आणि आरोग्याची होणारी हेळसांड यामुळे आता पर्यंत पालिकेच्या रुग्णालयांमध्ये तीन निवासी डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. अश्या परिस्थिती मध्ये निवासी डॉक्टरांच्या कामाची वेळ कमी करावी आणि आरोग्याची तपासणी करावी अशी मागणी नगरसेवक रामाशिष गुप्ता यांनी ठरावाच्या सुचणे द्वारे केली होती. या अनुषंगाने पालिका प्रशासनाने डॉक्टरांच्या कामाचे तास कमी करण्याचा तसेच वर्षातून एकदा तपासणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पालिका सभागृहामध्ये जाहीर केले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS