पालिका मुख्य रस्ते व रेल्वे स्थानकाबाहेर महिलांसाठी शौचालयांची उभारणी करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2014

पालिका मुख्य रस्ते व रेल्वे स्थानकाबाहेर महिलांसाठी शौचालयांची उभारणी करणार

मुंबई मध्ये महिलांसाठी शौचालये नसल्याने होणारी कुचंबना कमी व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेने शहरातील मुख्य रस्ते आणि रेल्वेच्या स्थानकाबाहेर महिलांसाठी शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 
मुंबई मध्ये पुरुषांच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कामावर जाणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. परंतू स्त्री आणि पुरुषांच्या लोकसंखेच्या प्रमाणात महिलांसाठी शौचालयांची संख्या अपुरी आहे. यामुळे महिला वर्गाची गैरसोय होत असून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने मुंबईच्या हद्दीमध्ये पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर सर्व रेल्वे स्थानका बाहेर तसेच मुख्य रस्त्यांशेजारी सेवाभावी नोंदणीकृत संस्थांच्या सहकार्याने महिलांसाठी अग्रक्रमाने शौचालयांची उभारणी करावी अशी मागणी नगरसेवक रामअशिश गुप्ता यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. पालिकेने हि ठरावाची सूचना मान्य केली असून लवकरच शहरातील मुख्य रस्ते आणि रेल्वे स्थानकाबाहेर महिलांसाठी शौचालये उभारण्यात येतील असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी जाहीर केले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS