देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2014

देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी मोर्चा

मानखुर्द : देवनार डम्पिंग ग्राऊंड आणि प्रदूषणकारी एसएमएस इन्व्होक्लीन प्रा. लि. कायमचे बंद व्हावे, याकरिता युसूफ अब्राहनी हे गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते. यामुळे मानखुर्द-शिवाजी नगर परिसरात क्षयरोग आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने संतप्त झालेल्या माजी आमदार आणि युसूफ अब्राहनी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करत महापालिका कार्यालयाला प्रतीकात्मक म्हणून टाळे लावले आणि मुख्य प्रवेशद्वार बंद केले . 
शिवाजी नगर, बैंगनवाडी आणि नटवर पारेख कम्पाऊंड या वसाहतींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याची बाब नागरिकांनी या वेळी निदर्शनास आणून दिली. डम्पिंग ग्राऊंडची क्षमता केव्हाच संपली असून कचर्‍याची उंची ९ मजली इमारतीएवढी झाली असून विद्यमान आमदार अबू आझमी हे मतदारांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून त्यांनीच १७६ कोटी रुपयांचे टेंडर घेऊन देवनार डम्पिंग ग्राऊंड सुरू ठेवल्याचा गंभीर आरोप युसूफ अब्राहनी यांनी आपल्या भाषणात केला. धरणे आंदोलन केल्यानंतर अब्राहनी यांनी महापालिका कार्यालयाच्या मुख्यद्वाराला टाळे लावले. यादरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यांच्या या कृत्याने संतापलेल्या युसूफ अब्राहनी यांनी आंदोलकांना घेऊन थेट घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS