के.ई.एम.मधील डॉक्‍टर निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2014

के.ई.एम.मधील डॉक्‍टर निलंबित

मुंबई - महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी बुधवारी (ता.25) के. ई. एम. रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी सेवेवर गैरहजर असतानाही सही करणारे डॉक्‍टर उदय लिमये यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 
अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या भेटीत के. ई. एम. रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी रुग्णालयातील नेफ्रॉलॉजी रेडिऑलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उदय लिमये गैरहजर असल्याचे आढळले. मात्र, मस्टरवर त्यांच्या नावाच्यापुढे त्यांची सही आढळली. त्यामुळे डॉ. लिमये यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, तोपर्यंत डॉ. लिमये यांना निलंबित करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, डॉ. लिमये परदेशी गेले असल्याचे समजते. भेटीदरम्यान आयुक्तांनी केलेल्या पाहणीत सुमारे 40 टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS