एमडीआर क्षयाची तपासणी ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2014

एमडीआर क्षयाची तपासणी ठप्प

मुंबई - शिवडीतील क्षय रुग्णालयाला तपासणीसाठी आवश्‍यक असलेले किट केंद्र सरकारकडून मिळाले नसल्याने अनेक दिवसांपासून येथील तपासणी बंद पडली आहे, असा आरोप बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.
या आजारावरील उपचारात खंड पडल्यास क्षय औषधांना दाद देत नाही. मुंबईत एमडीआर टीबीचे साडेचार ते पाच हजार रुग्ण आहेत. त्यांचे औषध ठरवण्यासाठी "एलपीए‘ चाचणी करावी लागते. ही चाचणी जे.जे. या सरकारी आणि पालिकेच्या शिवडी येथील रुग्णालयात होते. या चाचणीसाठी आवश्‍यक किट केंद्र सरकारने दिले होते; मात्र ते संपल्यानंतर दिले नसल्याने पालिका रुग्णालयातील ही चाचणी बंद पडली असल्याचे शिवसेनेच्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी सांगितले. एलपीए टेस्टमधून क्रिफामायसिंग आणि आयएनएच या औषधांना रुग्ण प्रतिसाद देईल का, हे समजते. मुंबईत 25 ते 30 हजार रुग्ण साध्या क्षयाचे, साडेचार ते पाच हजार रुग्ण एमडीआरचे आणि एक्‍स्ट्रीमचे 29 रुग्ण आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS