मोफत घरपोच पास योजनेकडे प्रवाशांची पाठ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2014

मोफत घरपोच पास योजनेकडे प्रवाशांची पाठ


मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमध्य रेल्वे मार्गावरील सुमारे २८ लाख पासधारक प्रवाशांपैकी फक्त १00 पासधारक प्रवासी अँानलाईन पास काढण्याच्या सुविधेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पास घरपोच पोहोचविण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे २0-३0 रुपये शुल्क घेतले जात होते. मात्र वर्षभरानंतर ऑनलाईन पास या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने मोफत घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली; परंतु मोफत घरपोच सेवा देण्यास सुरुवात केल्यानंतरच प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.२00६ पासून ही सेवा सुरू केल्यानंतर वर्षभरातच मध्य रेल्वेच्या २८ लाख पासधारकांपैकी ७ हजारांपेक्षा जास्त पासधारकांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन पास काढल्यानंतर हा पास थेट घरी येत असल्याने प्रवाशांनी रांगा लावण्याऐवजी हा पर्याय निवडण्यास सुरुवात केली. पास घरी पोहोचविण्यासाठी मध्य रेल्वेने शुल्कही आकारले होते. प्रथम दर्जाचा पास पोहोचविण्यासाठी ३0 रुपये तर द्वितीय श्रेणीचा पास पोहोचविण्यासाठी २0 रुपये शुल्क आकारले जात होते. या योजनेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा, या विचाराने मध्य रेल्वेने पास घरपोच पोहोचविण्यासाठी शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला.

२00७ पासून ऑनलाईन पास मोफत घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू केली. मात्र या मोफत योजनेमुळे ऑनलाईन पास प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत गेला. रेल्वेने मोफत घरपोच पास सेवा देण्यास सुरुवात केल्यानंतर बहुधा प्रवाशांच्या मनात या योजनेबद्दल प्रश्न निर्माण झाले असावेत, असा अंदाज मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त क रतात.या ऑनलाईन पास सेवेची जाहिरात करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले. मात्र आता तरी या योजनेची जास्तीत जास्त माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविल्यास सुमारे २८ लाख पासधारक प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS