पालिका रुग्णालयात ऑगस्ट मध्ये नवीन डॉक्टर नर्सची पदे भरणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2014

पालिका रुग्णालयात ऑगस्ट मध्ये नवीन डॉक्टर नर्सची पदे भरणार

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४८0 शिकाऊ डॉक्टर्स (इंटर्न) देण्याची तयारी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दाखवली आहे. त्यापैकी निम्मे डॉक्टर्स तीन मुख्य आणि तीन उपनगरीय रुग्णालयांत पाठवण्यात येणार आहेत. तर बाहेरून २२0 डॉक्टर्सही घेण्यात येणार आहेत. तर परिचारिकांच्या ८00 रिक्त जागा पालिकेच्या परिचारिका प्रशिक्षण संस्थेतून भरण्यात येणार असून, तंत्रज्ञांची पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील अशी माहिती देशमुख यांनी दिली.
पालिकेच्या तीन मुख्य आणि १८ उपनगरीय रुग्णालयांतील निष्णांत डॉक्टर, परिचारिकांचा तुटवडा, चांगल्या यंत्रसामग्रींची कमतरता हे चित्र असले तरी तेथे सुधारणा करण्यासाठी, ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी पालिकेला अजूनही वाव आहे. एकाच वेळी दररोज तब्बल ४0 हजार रुग्ण पालिकेच्या तीन रुग्णालये आणि अन्य रुग्णालयात उपचारासाठी येतात. एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्ण भारतातील अन्य रुग्णालयांत येतात का, हे शोधावे लागेल. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स उत्कृष्ट आहेत; पण ते कायमस्वरूपी नसल्याने त्यांची पदनिर्मिती करून 'स्पेशलाईज्ड' डॉक्टरांना कंत्राटी नेमून त्यांना दरमहा ७५ हजार रुपये मानधन देण्याचा पालिकेचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला आहे. पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर्स आठ ते १0 तासांऐवजी १२ तास काम करतात. 

Post Bottom Ad

JPN NEWS