अँण्टी करप्शनची पाच महिन्यांत ७४६ जणांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2014

अँण्टी करप्शनची पाच महिन्यांत ७४६ जणांवर कारवाई

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comराज्याच्या अँण्टी करप्शन ब्युरो विभागाने गेल्या पाच महिन्यांत राज्यभरातील आठ परिक्षेत्रांमध्ये तब्बल ४५५ ठिकाणी सापळा रचून लाचखोर अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविणार्‍या अधिकार्‍यांवर अपसंपदेचे २५ तर इतर भ्रष्टाचाराच्या १४ प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईअंतर्गत शासकीय अधिकारी, कर्मचारी, इतर लोकसेवक व खाजगी व्यक्ती अशा एकूण ७४६ आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सापळा रचून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १ कोटी ३३ लाख ९४ हजार रुपयांची रोकड तर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याप्रकरणी केलेल्या कारवाई अंतर्गत एकूण ६२ कोटी ६0 लाख किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, अँण्टी करप्शन विभागाने ४५५ ठिकाणी सापळा रचून केलेल्या कारवाई अंतर्गत वर्ग-१चे ३८, वर्ग-२चे ७४, वर्ग-३चे ६७, वर्ग-४ चे १८, इतर लोकसेवक ३९ व खाजगी व्यक्ती ८८ मिळून एकूण ६२४ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. तर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याप्रकरणी दाखल झालेल्या एकूण २५ गुन्ह्यात वर्ग-१चे १३, वर्ग-२ चे ५, वर्ग-३ चे ६ इतर लोकसेवक १, खाजगी व्यक्ती २५ मिळून एकूण ५0 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य भ्रष्टाचार प्रकरणी दाखल झालेल्या एकूण १४ गुन्ह्यांमध्ये वर्ग-१ चे १७, वर्ग-२ चे ८, वर्ग-३ चे १४, इतर लोकसेवक ३, खाजगी व्यक्ती ३0 मिळून ७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी २0१४ ते मे २0१४ या कालावधीमध्ये एकूण २१६ सापळा लावून कारवाई करण्यात आली. सापळा वाढीचे हे प्रमाण ९0 टक्के आहे. सन २0१३ मध्ये न्यायालयाद्वारे शाबीत निकाल दिलेल्या खटल्यांचे प्रमाण २१ टक्के होते. सन २0१४ मध्ये ३१ मे २0१४ पर्यंत शाबीत निकालांचे प्रमाण २९ टक्के असल्याचे अँण्टी करप्शन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS