अनधिकृत कॅम्पा कोलाचे पाणी तोडण्यास पालिकेला अपयश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2014

अनधिकृत कॅम्पा कोलाचे पाणी तोडण्यास पालिकेला अपयश

मुंबई - वरळी येथील कॅम्पा कोला संकुलातील 90 बेकायदा सदनिकांवर सोमवारी कारवाई करण्यास महानगर पालिकेने सुरवात केली असून त्यातील 55 सदनिकांची वीजजोडणी तोडण्यात आली. ही कारवाई पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. पालिकेने वीज आणि ग्यास जोडणी तोडण्यास सुरु केले असले तरी पालिकेला पाणी कनेक्शन तोडता आलेले नाही. 
रहिवाशांनी आजही सदनिकांच्या चाव्या देण्यास पालिकेला नकार दिला. कॅम्पा कोला संकुलातील बेकायदा सदनिकांवर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सर्वप्रथम 27 नोव्हेंबर 2013 रोजी दिले होते. तेव्हापासून महापालिकेची ही कारवाई अनेक वेळा स्थगित करण्यात आली. अखेरीस कारवाई आज सुरू झाली. महापालिकेच्या पथकाने सकाळी पावणेबाराच्या सुमारास कॅम्पा कोलात प्रवेश करून कारवाईस सुरवात केली. वीज आणि गॅस जोडणी पालिकेने तोडली. 

परंतू अधिकृत आणि अनधिकृत रहिवाश्यांना पाण्याच्या कनेक्शन बाबत पालिकेला माहिती नसल्याने तसेच पालिकेकडे या अनधिकृत इमारतीचा नकाशा नसल्याने पाणी तोडण्याची कारवाही पालिकेला करता आलेली नाही. अनधिकृत आणि अधिकृत रहिवाश्यांच्या पाण्याच्या कनेक्शन बाबत पालिका शोध घेत असून लवकरच अनधिकृत रहिवाश्यांचे पाणी कनेक्शन तोडण्यात येईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी दिली आहे. 

क्याम्पाकोलावर मंगळवार बुधवार असे दोन दिवस कारवाई सुरू राहणार असून 90 बेकायदा घरांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त आनंद वाघराळकर यांनी सांगितले आहे. 

दिवसभरातील कारवाई 90 पैकी 55 घरांची वीज तोडली 
48 पैकी 14 सदनिकांची गॅस जोडणी तोडली 
90 घरांपैकी 3 घरांचे पाणी तोडले 

Post Bottom Ad

JPN NEWS