आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा पालिकेचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2014

आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यातील आरोग्य सेविकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 
मुंबईमधील आरोग्य खात्या अंतर्गत पल्स पोलिओ, कुटुंब नियोजन, गरोदर महिलांना समुपदेशन, जन्म झालेल्या लहान मुलांना विविध प्रकारचे डोस व इंजेक्शन देणे, पावसाळ्यात साथीच्या रोगांची औषधे देणे तसेच आरोग्यविषयक माहितीचा प्रसार व प्रचार करणे यासारखी कामे आरोग्य सेविका करत असतात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेविकांना मात्र तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यांना महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, रजेचे व इतर कोणतेही फायदे दिले जात नसल्याने या आरोग्य सेविकांची आर्थिक कुचंबना होत असते. यामुळे पालिकेतील आरोग्य सेविकांना शासनाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन मिळावे अशी मागणी नगरसेवक रामअशिश गुप्ता यांनी पालिकेकडे केली होती. गुप्त यांनी केलेल्या मागणी प्रमाणे आरोग्य सेविकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS