"माता रमाई आंबेडकर वरळी स्मशानभूमी" नावाला पालिकेची मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2014

"माता रमाई आंबेडकर वरळी स्मशानभूमी" नावाला पालिकेची मंजुरी

मुंबई / अजेयकुमार जाधव  http://jpnnews.webs.com
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचे नाव वरळी स्मशान भूमीला देण्यास मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी मंजुरी दिली असल्याने आता या स्मशान भूमीचे "माता रमाई आंबेडकर वरळी स्मशानभूमी" असे नामांतर केले जाणार आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर वरळी येथील स्मशान भूमी मध्ये अंतिमसंस्कार करण्यात आले होते. या स्मशानभूमी मध्ये स्थानिक बौद्ध बांधवांनी माता रमाई यांचा पुतळा तसेच स्मारक उभारले आहे. माता रमाई यांचे स्मारक वरळी येथील स्मशानभूमीमध्ये उभारले जावे अशी मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात होती. तत्कालीन आरोग्य समित्तीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी भेट देवून स्मारक उभे करावे अश्या सूचना पालिकेला दिल्या होत्या. परंतु पालिकेने त्याकडे अद्याप दुर्लक्ष केले होते. 

याच दरम्यान सिद्धार्थ नगर आंबेडकरवादी युवक संघ, वरळी या संघटनेने वरळी येथील या विभागात ५० टक्के बौद्ध लोक राहतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचे निधन २७ मे १९३५ रोजी झाले. त्यांचा अंत्यविधी वरळी स्मशानभूमी मध्ये करण्यात आला होता हि वस्तूस्थिती नगरसेविका मानसी दळवी यांच्या निदर्शनास आणून वरळी स्मशान भूमीला माता रमाई यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती. 

स्थानिक बौद्ध जनतेची मागणीनुसार दळवी यांनी स्मशान भूमीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पालिकेकडे पाठवला होता. स्मशानभूमीचे नाव बदलण्यास पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंजुरी दिली असून आता आरोग्य समितीच्या बैठकी मध्ये प्रस्तावाला मंजुरी देण्याची औपचारिकता तेवढी बाकी राहिली आहे. यामुळे आता वारली स्मशानभूमीचे नाव आता  "माता रमाई आंबेडकर वरळी स्मशानभूमी" असे होणार आहे. स्मशानभूमीच्या नावात बदल करण्यास पालिकेने मंजुरी दिल्याने बौद्ध धर्मियांत आनंदाचे वातावरण असून माता रमाई यांचे स्मारक उभारायला सुद्धा पालिकेने मंजुरी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

Displaying mata ramai smarak worli smashan bhumi 23 dec 2011 (4).jpgDisplaying mata ramai smarak worli smashan bhumi 23 dec 2011 (7).jpg

Post Bottom Ad

JPN NEWS