गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी स्वाभिमान संघटनेने गौरी-गणपतीसाठी खास बसेस कोकणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांच्या सोयीसाठी खास ७२ बसेस संघटनेमार्फत चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे केवळ १00 रुपयांत कोकणात जाता आणि परत येता येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रेल्वे, एसटीची तिकिटे आगाऊ आरक्षित केली जातात. अनेक चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेतर्फे २४ ते २८ ऑगस्टदरम्यान ७२ बसेस कोकणासाठी चालवण्यात येणार आहेत. कोकणात जाऊन परत येण्यासाठी फक्त १00 रुपये आकारण्यात येणार आहेत. या योजनेतून मिळणारा निधी हा कोकणातील तरुणांच्या शैक्षणिक विकासासाठी वापरण्यात येणार आहे. २४ ते २६ ऑगस्टदरम्यान प्रत्येकी ८ बसेस चालवण्यात येणार आहेत, तर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बसेस कोकणासाठी रवाना करण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली, वसई, विरार, नालासोपारा आणि नवी मुंबई या ठिकाणांहून ही बस सेवा चालवण्यात येणार आहे. या बस सेवेसाठी आगाऊ आरक्षण २१ ऑगस्टपासून वांद्रे येथील संघटनेच्या कार्यालयात करावयाचे आहे. कोकणात जाऊ इच्छिणारे चाकरमानी आगाऊ आरक्षण आणि चौकशीकरिता 0२२-२६४२१४५२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.