'पॉवर सेव्हर' उपकरण खोटे - बेस्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2014

'पॉवर सेव्हर' उपकरण खोटे - बेस्ट

विजेची बचत होण्यासाठी विशिष्ट यंत्राची खरेदी करा, असे सांगत मुंबईत काही कंपन्या यंत्र विकण्याचा सपाटा लावत आहेत. विशेष म्हणजे बेस्टने या यंत्राला मंजुरी दिल्याचेही सांगण्यात येत असल्यामुळे मुंबईकर हे वीज यंत्र कोणताही विचार न करता खरेदी करत आहेत. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने अश्या कोणत्याही यंत्राला बेस्टने मान्यता दिलेली नाही असे बेस्टने स्पष्ट केले आहे. मुंबई शहरातील दादर, शिवाजी पार्क, परेल, नायगाव, लालबाग, शिवडी, वडाळा, वरळी या भागामध्ये वीज बचत यंत्र विकण्यासाठी घरोघरी सेल्समन येत आहेत. या सेल्समनकडे बेस्टचे वीज बिल असून या वीज बिलाच्या मागे वीज बचत यंत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. याकडे सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये समिती सदस्य केदार हुंबाळकर यांनी लक्ष वेधले. त्यामुळे समिती सदस्यांसह बेस्टचे महाव्यवस्थापक ओम प्रकाश गुप्ता यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. या यंत्राची किंमत दीड हजार रुपये ते पाचशे रुपयांपर्यंत आहे.

एखाद्या घरात वृद्ध व्यक्ती असेल तर तिला हे यंत्र ५00 रुपयांत दिले जाते. आपल्या वडिलांनादेखील याचा अनुभव आल्याचे हुंबाळकर यांनी सांगितले. घरातील प्लगला हे यंत्र लावले की विजेची बचत होत असल्यामुळे अनेकांनी हे यंत्र खरेदी केले आहे. ही यंत्रे उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात विकली जातात, त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात वीज बिल कमी येते; पण लोकांना आपले बिल कमी आल्याची खात्री पटते. अशा बेकायदेशीर विकल्या जाणार्‍या यंत्रामुळे बेस्टचे नाव खराब होत असून त्याला त्वरित आळा घालण्यात यावा, अशी मागणी केदार हुंबाळकर यांनी केली.

या यंत्राशी बेस्ट उपक्रमाचा कोणताही संबंध नाही. कोणत्याही कंपनीला अशी यंत्र बनवण्यासाठी बेस्टने परवानगी दिलेली नाही. जर कोणी बेस्टच्या बिलाचा वापर करून वीज ग्राहकांची फसवणूक करत असेल, तर अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.
     

Post Bottom Ad

JPN NEWS