फेसबुकवरील ११ आक्षेपार्ह पेजेस बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2014

फेसबुकवरील ११ आक्षेपार्ह पेजेस बंद


fb

फेसबुकवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टरवरून समाजात पुन्हा तेढ निर्माण होऊ नये यासाठी मुंबईकर पुढे सरसावले आहेत. अशा पोस्ट पसरू नयेत, तसेच त्या पसरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून १४ आक्षेपार्ह लिंकविषयी मुंबईकरांनी पोलिसांना कळविले असून, त्यातील ११ लिंक पोलिसांनी ब्लॉक केल्या आहेत. 
महापुरुषांची विटंबना करणाऱ्या पोस्टमुळे मे महिन्यात पुण्यात तणाव निर्माण झाला होता तसेच त्याची परिणती एका तरुणाच्या हत्येतही झाली होती. मुंबईमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ९८२०८१०००७ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. १३ जूनपासून सुरू झालेल्या या हेल्पलाइनला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, ती सुरू झाल्यापासून अवघ्या २४ दिवसांत १४ आक्षेपार्ह पेज/पोस्टबद्दल नागरिकांनी पोलिसांना कळविले आहे. त्यातील ११ लिंक पोलिसांच्या सायबर सेलने ब्लॉक केल्या आहेत. तसेच उरलेल्या तीन लिंकवर नजर ठेवण्यात येत आहे, असे पोलिस उपायुक्त (अंमलबजावणी) डॉ. महेश पाटील यांनी सांगितले. समाजात सलोखा टिकून राहावा यासाठी दक्ष नागरिकांनी अशाप्रकारे आपला सहभाग देत राहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

तक्रार अशी करा ...
फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सवर सामाजिक तेढ निर्माण करणारा कुठलाही मजकूर आढळून आल्यास त्याची तक्रार ९८२०८१०००७ या क्रमांकावर फोन किंवा एसएमएस द्वारे करता येऊ शकते. 

Post Bottom Ad

JPN NEWS