मालवाहतूक दरांत 6.5 टक्के व प्रवासी भाड्यात 14.2 टक्के अशी भाववाढ अर्थसंकल्प पूर्व केल्यानंतर आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला.
रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
- बुलेट ट्रेनच्या बांधणीसाठी नऊ लाख कोटींची गरज
- एका बुलेट ट्रेनसाठी 60 हजार कोटींची गरज
- प्रलंबित योजनांसाठी पाच लाख कोटींची गरज
- देशातील चार प्रकल्प 30 वर्षांपासून प्रलंबित, आतापर्यंत 359 योजना प्रलंबित
- नऊ वर्षात 99 योजनांची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात एकच योजगा पूर्ण झाली
- अनेक भागात रेल्वे पोहचवण्याचं ध्येय
- जपान, चीन प्रमाणे रेल्वे वाहतूक क्षेत्रात प्रगती करायची आहे
- भारतीय रेल्वे ही अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे
- भारतीय रेल्वेसमोर अनेक आव्हाने आहेत
- नवे लोहमार्ग व गाड्या ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे
- लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत
- जगात सर्वांत जास्त मालवाहतूक करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे
- दोन कोटी 30 लाख नागरिक रोज रेल्वेने प्रवास करतात
- दरवर्षी रेल्वे 100 टनांचा माल वाहतूक करते
- चांगल्या सुविधांसाठी नागरिकांनी अनेक चांगले सल्ले आम्हाला दिले आहेत
- अनेक भागात रेल्वे पोहचविण्याचे आमचे उद्दीष्ट आहे
- संरक्षण क्षेत्रामध्ये साधने पुरविण्याचे रेल्वेचे महत्त्वाची भूमिका आहे
- 1 रूपया कमाविल्यानंतर 94 पैसे रेल्वेचे खर्चून जातात
- आतापर्यंत 359 नव्या योजना प्रलंबित आहेत
- 9 वर्षांत 99 योजनांची घोषणा, यातील फक्त एक योजना पूर्ण झाली आहे.
- प्रलंबित योजना पूर्ण करम्यासाठी पाच लाख कोटी रुपयांची गरज आहे
- चार प्रकल्प 30 वर्षांपासून प्रलंबित आहेत
- 3738 किमीचे नवे प्रकल्प उभारण्याची योजना आहे
- रेल्वेच्या भाडेवाढीमुळे आठ हजार कोटींचे उत्पन्न वाढले आहे
- बारामुल्ला ते कन्याकुमारी असा रेल्वेचा विस्तार करण्यात येणार आहे
- बुलेट ट्रेनच्या बांधणीसाठी 9 लाख कोटींची गरज आहे
- एक बुलेट ट्रेनसाठी 60 हजार कोटींची गरज आहे
- रेल्वेची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कडू औषधाची गरज आहे
- रेल्वेमार्गांच्या दुपरीकरणात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे
- रेल्वेमध्ये परकी गुंतवणुकीची (एफडीआय) गरज आहे
- पीपीपी मॉडेलची मोठ्या प्रकल्पांसाठी खूप गरज आहे
- रेल्वे योजना पीपीपीद्वारे पूर्ण केल्या जातील
- फक्त रेल्वे भाडेवाढ करणे हा एकमेव उपाय नाही
- उत्पन्नाच्या 94 टक्के रक्कम व्यवस्थापनासाठी खर्च
- पर्यटनासाठी जाहिरातीमधून पैसे मिळविण्याची योजना
- हायस्पीड रेल्वेसाठी बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या योजनेचा वापर करण्यात येणार
- नवीन रेल्वे स्थानके व वॅगन निर्मितीसाठी एफडीआयचा वापर करणार
- 3700 किमी रेल्वेमार्गासाठी 41 हजार कोटींची गरज आहे
- बॅटरी ऑपरेट वाहनांची स्थानकांवर सोय करणार
- मुंबईतील पासच्या किंमती कमी केल्याने 610 कोटींचा तोटा झाला.
- रेल्वेचा फायदा 4200 कोटींनी घटला, त्यामुळे अनेक प्रकल्प रखडले
- ऑनलाईन बुकींगला प्राधान्य देण्यात येणार
- मोठ्या रेल्वे स्थानकांवर सोईसुविधा वाढविण्यात येणार
- देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची गरज आहे
- मालवाहतुकीत 4.9 टक्के वाढीचे उद्दीष्ट आहे
- रेल्वेतल्या भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी रेडी टू इट सुविधा सुरू करणार
- व्यावसायिकांसाठी निवडक रेल्वे स्थानकांवर संगणक सुविधा उपलब्ध करून देणार
- रेल्वेत ब्रँडेड भोजन उपलब्ध करून देणार
- स्वच्छतेसाठी 40 टक्के खर्च करणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरीवर चालणारी व्हिलचेअर पुरविणार
- रेल्वेमध्ये जेवणाची ऑर्डर एसएमएसद्वारे देता येणार
- सुरक्षेसाठी प्रत्येक स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार
- पिण्याचे पाणी आणि स्वच्छता देण्यावर भर देण्यात येणार
- बुलेट ट्रेन भारतात आणण्यासाठी भाड्यात आणखी वाढ करावी लागेल, त्यामुळे सध्या बुलेट ट्रेन सुरू करणे शक्य नाही
- काही गाड्यांमध्ये संगणक सुविधा पुरविण्यात येणार
- स्थानकाची स्वच्छता राखण्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात येणार
- प्रवासी सुरक्षिततेसाठी भर देण्यात येणार
- 1780 कोटी रुपये पुल दुरुस्ती व सिग्नल यंत्रणा सुधारण्यासाठी वापरण्यात येणार
- सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी 40 हजार कोटींची गरज आहे
- मानवरहित रेल्वे क्रॉसिंग सुरू करणार
- कर्नाटक आणि महाराष्ट्रला जोडण्यासाठी गदग व पंढरपूर अशी नवी गाडी सुरू करण्यात येणार
- मोबाईलच्या माध्यमातून रेल्वे बुकींग करता येणार
- उपनगरिय गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसविण्यासाठी उपाययोजना करणार
- सर्व धर्मियांच्या यात्रेसाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून देणार
- रेल्वेतल्या शिक्षणासाठी खास रेल्वे विद्यापीठ सुरू करण्याचा मानस आहे
- रेल्वेतल्या सेवा, सुविध व तंत्रज्ञान याबाबत विद्यापीठात शिक्षण देणार
- यावर्षी पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी देण्यात येणार
- शक्य तितक्या लवकर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जोडणार
- बायो टॉयलेटची व्यवस्था सुरू करणार
- नऊ मार्गांवर हायस्पीड रेल्वेची सुविधी सुरू करणार, या गाड्या 200 किमी प्रतितास वेगाने धावणार
- मोठ्या रेल्वे स्थानकांवर फुड कोर्ट सुरू करणार
- पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी खास पर्यटन गाड्या सुरू करणार
- लोकल रेल्वे गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसविणार
- ई तिकीटाद्वारे मिनिटाला 7400 तिकीटे मिळणे शक्य होणार आहे
- जलद गाड्यांचा हिरक चतुष्कोन स्थापन करणार
- पाच वर्षांत रेल्वेचा कारभार पेपरलेस करणार
- 9 विभागांत रेल्वेच्या गतीत वाढ करणार, 160 ते 200 किमी प्रतितास वेगाने रेल्वे धावणार
- सर्वांत मोठ्या रेल्वे व स्थानकांवर वायफाय सुविधा पुरविण्यात येतील
- नागपूर-विलासपूर मार्गावर जलद गाड्यांचे जाळे निर्माण करणार
- एमबीए आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी सामावून घेणार
- मोठ्या शहरांसाठी हायस्पीड कॉरिडर्स
- विकासासाठी खासगीकरणावर भर देणार
- इंटेननेटद्वारे जनरल व प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार
- दिल्ली-आग्रा, दिल्ली-कानपूर दरम्यान हायस्पीड गाड्या सुरू करणार
- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीत वाढ करणार
- रेल्वेचे तिकीट कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार
- ई निविदांवर भर देण्यात येणार
- शेतमालासाठी वातानुकुलीत गोडाऊन उभारण्यात येणार
- दहा रेल्वे स्थानकांचा विमानतळाप्रमाणे विकास करणार
- चालू प्रकल्पांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार
- दूध, फळ, भाजी वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार
- अमूलचे दूध देशात वितरित होण्यासाठी रेल्वे दूध टँकरची वाहतूक करणार
- इंधनात पाच टक्के बायो डिझेलचा वापर करणार
- 10 शहरांतील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांकडे देणार
- सौरउर्जेचा वापर स्थानकावरील विद्युतीकरणासाठी करण्यात येणार
- महिला सुरक्षेसाठी 4000 महिला जवान
- पूर्वोत्तर राज्यांतील रेल्वेसाठी 54 टक्के जास्त तरतूद
- 11 हजार 560 स्थानकांवर सुरक्षारक्षक नाहीत, त्याठिकाणी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येणार
- औरंगाबाद-चाळीसगाव दरम्यान नवा रेल्वे मार्ग सुरू करणार
- कासारा-ईगतपुरी दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुरू करणार
- सोलापूर- तुळजापूर दरम्यान रेल्वे मार्ग उभारण्यात येणार
- कर्जत-लोणावळा नवी लाईन सुरू करणार

