महागाईविरोधात काँग्रेसचे ६ जुलैला राज्यव्यापी आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2014

महागाईविरोधात काँग्रेसचे ६ जुलैला राज्यव्यापी आंदोलन

फोर्ट : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ येत्या ६ जुलैला राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात महागाई कमी करण्याच्या अनुषंगाने जनतेला भरमसाट आश्‍वासने दिली होती. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना या आश्‍वासनांचा विसर पडला. त्यांचे सरकार आल्यानंतर महागाई सतत वाढतच असून त्यांनी प्रचारात दिलेली आश्‍वासने फसवी सिद्ध झाली आहेत. केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेल, रेल्वेभाडे, स्वयंपाकाचा गॅस आणि दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तूंची भाववाढ झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. 

प्रामुख्याने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते दुचाकी वाहने चालवत नेण्याऐवजी मुख्य रस्त्यांवरून त्या ढकलत नेणार आहेत. याव्यतिरिक्त इतर पद्धतींनीही निषेध कार्यक्रम राबवून केंद्र सरकारचा ढोंगीपणा समोर आणला जाईल. मोदी सरकारच्या 'करणी व कथनी'मधील फरक निदर्शनास आणून देण्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS