रविवारी ( ६ जुलाई ) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रविवारी ( ६ जुलाई ) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Share This
मुंबई - मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर रविवारी ( ६ जुलाई )सकाळी 11 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या ठाणे व डोंबिवली स्थानकांवर थांबतील. डाऊन जलद मार्गावर सीएसटीहून सकाळी 10.08 ते दुपारी 2.40 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व गाड्या त्यांच्या नेहमीच्या स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबतील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या सकाळी 10.50 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत त्यांच्या नेहमीच्या स्थानकांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर व कुर्ला स्थानकांवर थांबतील. 
डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. अप व डाऊन हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल. सीएसटीहून पनवेल, बेलापूर व वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसटीसाठी सुटणाऱ्या गाड्या 10.20 ते 3.04 वाजेपर्यंत बंद राहतील. 

पश्‍चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते 4.30 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. या काळात धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवण्यात येतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages