दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाचे ०१ ऑगस्ट रोजी लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2014

दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाचे ०१ ऑगस्ट रोजी लोकार्पण

Displaying BMC_4596.jpg
दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या ०१ ऑगस्ट२०१४ रोजी विलेपार्ल्याचेच नव्हे तर मुंबईचे भूषण ठरणारे नूतनीकृत नाटय़गृह पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होत आहेअशी घोषणा मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी केलीते आज (दिनांक ०५.०७.२०१४विलेपार्ले (पूर्वपरिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मादीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाच्या नूतनीकरणाची पाहणी करतेवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होतेयाप्रसंगी त्यांचेसमवेत असणाऱया नाटय़क्षेत्रातील मान्यवरांनी दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे कार्य अत्यंत चांगल्याप्रकारे व वेळेत पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष आभार मानले.

या पाहणी दौऱयादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी सांगितले की, २००९ मध्ये बोरिवली येथील महापालिकेच्या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत उत्कृष्टप्रकारे पूर्ण झाल्यानंतरच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना अनेक रंगकर्मींनी विलेपार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाचे नूतनीकरण व्हावे,अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली होती.त्यानुसार तातडीने दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाचे नूतनीकरण करण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन महापौरांच्यामार्फत महापालिका प्रशासनास निर्देश दिले होते. सदर निर्देशांनुसार विलेपार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.

या नाटय़गृहाचे काम अधिकाधिक उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचे व्हावेयासाठी नाटय़क्षेत्रातील मान्यवरांची मते लक्षात घेऊन नाटय़गृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहेनूतनीकरणाचे कार्य आता अंतिम टप्प्यात असून सदर कार्य निश्चितच समाधानकारक झाले आहे आणि या नाटय़गृहात आपली कला सादर करताना रंगकर्मींनादेखील निश्चितच आनंद होईलज्यामुळे त्यांना आपली कला अधिक उत्साहाने व चांगल्याप्रकारे सादर करता येऊन प्रेक्षकांच्या आनंदातही निश्चितच भर पडेलअसा विश्वास मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी पाहणी दौऱयादरम्यान व्यक्त केला.

याप्रसंगी मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी उपस्थित सर्व मान्यवरांसमवेत नाटय़गृहातील नूतनीकरण कार्यांची पाहणी करुन व उपस्थितांशी सल्लामसलत करुन महापालिकेच्या अधिकाऱयांना तसेच संबंधित कंत्राटदाराला नूतनीकरणाशी संबंधित आवश्यक त्या सूचना केल्याज्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुयोग्य आसन व्यवस्थावातानुकूलन व वायुविजन व्यवस्थाग्रीन रुमबाबत सूचना,प्रकाश व्यवस्थातिकीट विक्री व्यवस्थानिर्माता कक्षजलपान सुविधाग्रंथालय सुविधा याबाबत यथोचित सूचना करण्यात आल्या.तसेच नूतनीकरणाचे काम सुयोग्यरित्या २५ जुलैपर्यंत पूर्ण करुन येत्या ०१ ऑगस्ट २०१४ रोजी सदर नाटय़गृहाचे लोकार्पण करण्यात येईलअशी घोषणा देखील महापौर सुनिल प्रभु यांनी केली.

या दौऱयादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रभु यांनी आवर्जुन नमूद केले कीमुलुंड येथील कालीदास नाटय़गृह व गिरगांव चौपाटी जवळील राजा बलदेवदास बिर्ला क्रीडा केंद्रातील नाटय़गृह यांच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहेतसेच मुंबईकरांच्या सेवेत नवीन नाटय़गृहे रुजू व्हावीतयासाठी भांडुपगोरेगांव व घाटकोपर-कुर्ला येथील नाटय़गृहासाठी आरक्षित असणारी जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरु आहेलवकरच ही जागा महापालिकेच्या ताब्यात येईल व तेथे नवीन नाटय़गृहांच्या निर्मितीचे कार्य महापालिकेद्वारे सुरु केले जाईलअसा विश्वास महापौर प्रभु यांनी यावेळी व्यक्त केलात्याचबरोबर मुंबई महापालिका क्षेत्रात प्रायोगिक नाटकांना सरावासाठी व सादरीकरणासाठी जागा उपलब्ध व्हावीयादृष्टीने महापालिका क्षेत्रात छोटी नाटय़गृहे तयार व्हावीत यादृष्टीने देखील प्रयत्न चालू असल्याचे महापौरांनी याप्रसंगी नमूद केले.


Post Bottom Ad

JPN NEWS