मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात ठीक ठिकाणी स्वच्छता ठेवा, रुग्णालय स्वच्छता अभियान असे फलक लावले असले तरी रुग्णालयाच्या आवारात मात्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सायन येथील टिळक रुग्णालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश करतानाच रुग्णालय इमारतीच्या गाते मधून आत शिरतानाच इमारतीचे पाईप फुटले असल्याने पाणी साचलेले आहे. रुग्णालयात प्रत्तेक मजल्यावर ठीक ठिकाणी कचराकुंड्या लावण्यासाठीची जागा दिसत आहे परंतु प्रत्तेक मजल्यावर एक किवा दोनच कचरा कुंड्या आहेत. ज्या कचरा कुंड्या आहेत त्यासुद्धा कचऱ्याने भरून गेलेल्या असल्या तरी त्यामधील कचरा उचलाल जात नसल्याचे समजते. रुग्णालय इमारतीच्या मागील बाजूस मोठे उद्यान बनवण्यात आलेले आहे. परंतू रुग्णालय इमारतीच्या पाईपमधून पडणारे पाणी आणि येथे जमलेला कचरा यामुळे या उद्यानाचा कोणीही जास्त वापर करत नाहीत.
अपघात विभाग असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या शौचालयाची स्वच्छता ठेवली जात नसल्याने प्रचंड दुर्गधी पसरली असते. रुग्णालय इमारती मधील युरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी वार्ड जवळ असलेल्या महिलांच्या शौचालयामधून घाणीचे पाणी बाहेर वाहत असते. एमआयसियु जवळ एक लिफ्ट आहे या लिफ्टच्या जवळ, महिला प्रसूती विभागाकडे जाण्याच्या तसेच रुग्णालयामधील सर्व जिण्यावर, खिडक्यांवर थुंकून ठेवण्यात आले आहे. अन्नपूर्णाबाई देशमुख प्रसूती कक्ष वार्ड क्रमांक १० आणि ११ समोरच तर प्राण्यांची विष्ठा पडलेली असते. रुग्णालयामध्ये इतकी घाण पसरली असताना रुग्णांनी या ठिकाणी उपचार घ्यायचे कसे, रुग्णांच्या नातेवाईकांनी अश्या घाणीमध्ये रुग्णालयामध्ये कसे राहायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तुम्हाला जर उत्तम उपचार व उत्तम रुग्ण सेवा हवी असेल तर सहकार्य करा रुग्णालय स्वच्छ ठेवा असे नुसते फलक लावल्याने काही होत नाही. रुग्णांना चांगली सुविधा मिळण्यासाठी चांगले वातावर निर्माण करण्याचे, चांगली स्वच्छता ठेवण्याचे काम रुग्णालय प्रशासनाचे आहे. रुग्णालय प्रशासनाला खरोखरच रुग्णांची काळजी घ्यायची असेल तर रुग्णालय स्वच्छ का ठेवले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत याचा वापर करून रुग्णालयामध्ये घाण करणार्यांवर अंकुश ठेवला जाऊ शकतो, रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक नुसते गप्प्पा मारण्याची कामे करतात अशा सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात सतत फिरत राहायला सांगितल्यास कोणी घाण करायची हिम्मत करणार नाही. रुग्णालय प्रशासनाकडे ज्या सुविधा आहेत त्याचा पुरेपूर वापरच केला जात नसल्याने रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे असा आरोप केला जात आहे. रुग्णालयाच्या डीनचे कार्यालय जितके स्वच्छ ठेवले जाते तितकीच स्वच्छता रुग्णालयाची ठेवावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

